सध्य स्थितीत लग्न व्यवस्थेची झालेली हेळसांड दयनीय आहे कारण लग्न हे संस्कार परंपरा न राहता सामाजिक प्रतिष्ठेची बाब झालेली आहेत आणी ही स्थिती सर्वच जाती व धर्मामध्ये हल्ली दिसून येतेय याला मुख्य कारण म्हणजे सुख ह्या शब्दाची बदललेली व्याख्या आहे.(भौतिक सुखाची असणारी हाव होय )
लोकांच्या अपेक्षा अवास्तव वाढत आहेत मुलगा सर्व गुण संपन्न हवा असतो म्हणजेच काय तर भौतिक सुखाकडे माणसांचा कौल फार वाढला आहे.त्याचं बरोबर आपण पाहतो आहे की पश्चिमात्य संस्कृती चा आपल्या कडे फार मोठ्या प्रमाणात शिरकावं झालेला आहे.मोठ्या शहरामध्ये लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्याचे प्रमाण वाढत चाललेआहे.सुशिक्षीत तरुण तरुणींना कुठल्याही प्रकारची जबाबदारी नको वाटत आहे त्यामुळे लग्न या बंधनात न अडकता मनसोक्त जगाव ही भावना निर्माण झाली आहे.
भौतिक सुखाच्या नादात अनेक तरुण तरुणी मोठया शहराकडे आकर्षित होत आहेत,त्यामुळे शेतकरी किंवा ग्रामीण भागातील नोकरीवाला किंवा उद्योग वाला अजिबातच नकोच अशी भावना मोठया प्रमाणावर वाढत आहे.हल्लीची बदलेली विचारांची पातळी,मानसिकता यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहेत.जीवन जगण्याची पद्धती आणी मानसिक स्वैराचार यामुळे आपल्या भारतीय संस्कृती आणी पारंपरा यांचा लोप पावत चालला आहे.
या सर्व बाबींचा विचार करता आपण समाजासाठी काही देण लागतो आहे या उद्धेशाने सर्वधर्मीय,घटस्फोटीत,विधवा,विदूर व इतर सर्व प्रकारच्या विवाह इच्छुक उमेदवार यांसाठी हक्कचा आधार मिळावा यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न.
श्री दिपक पाटील, संस्थापक अध्यक्ष.